अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची प्रक्रिया, यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
- TAIT 2017 मधील उमेदवारांना 196 व्यवस्थापनाचा जागेसाठी प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत
- प्राधान्यक्रम निवडण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2023 ते दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यन्तचा कालावधी देण्यात आला आहे.
- उमेदवारांनी आधी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे गरजेचे आहे.
- 6 ते 12 या वर्गासाठी 1:10 या प्रमाणे उमेदवार उपलब्ध होतील.
- मुलाखत व अध्ययन कौशल्य याकरिता 30 गुण व्यवस्थापनाकडे असतील
- शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम निवडू नये.
- पोर्टल संदर्भात लॉग इन मध्ये अडचण आल्यास किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला/ हरवीला असल्यास जवळच्या शिक्षणाधीकारी कार्यालयात संपर्क साधावा.
- अर्ज स्वप्रमाणित करण्यास अडचण येत असल्यास किंवा प्राधान्यक्रम लॉक करण्यात अडचण येत असल्यास edupavitra@gmail.com वर संपर्क साधावा.