देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून महिना झाला परंतु पुढची प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. पोर्टल वरील प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार तर्फे संबंधित कंपनीला निधी ही देण्यात आला आहे.परंतु प्रशासन व सरकार कडून काम सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला नाही.
सरकार कडून शिक्षक भरती साठी होत असलेल्या दिरंगाई बाबत व पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी,सर्व अभियोग्यताधारक डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणार आहे.
त्यासाठी दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी,वेळ सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान ट्विटर वरती #शिक्षकभरती_55000 हा हॅशटॅगच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार पुढे मांडणार आहे.
राज्यात 70 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहे हे उघड सत्य आहे तरीही सरकार भरतीला दिरंगाई करत आहे. 2022-23 हे शैक्षणिक वर्ष संपायला, दोन-चार दिवस बाकी आहे आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला 2 महीने वेळ आहे. याच दोन महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच शाळेला शिक्षक मिळेल.
#शिक्षकभरती_55000 ह्या हॅशटॅग ट्रेंड मध्ये सर्व अभियोग्यता धारक उमेदवारांनी सहभागी व्हावे तसेच ज्यांचे ट्विटर अकाऊंट नाही(खासकरून नवीन अभियोग्यता धारक) त्यांनी ते त्वरित तयार करावे. ट्रेंड मध्ये किमान 2 लाख ट्विट टाकण्याचे टार्गेट ठरले आहे, जेणकरून आपली मागणी सरकार आणि मेन स्ट्रीम मीडिया पर्यन्त पोहाचायला हवी.