
कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचे बीज रोवले,आपल सर्वस्व त्यांनी रयत साठी अर्पण केल. आज त्याचा वटवृक्ष झालेल्या आपल्याला दिसतोय. रयत ही आज देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. असाच एक शिक्षण संस्थेचा वटवृक्ष विदर्भाच्या मातीत सुद्धा उभा आहे, तो म्हणजे डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी लावलेल्या “श्री शिवाजी शिक्षण संस्था” अमरावती हा आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी भाऊसाहेबांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. भाऊसाहेब हे उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून वकिलीची तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर ते मायदेशी परतले. याचादरम्यान त्यांनी बेरार मराठा शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये मॅट्रिकच्या वर्गावर शिक्षक म्हणून कार्य केले. पुढे त्यांनी 1926 मध्ये श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले.
आपला शेतकरी-बहुजन समाज पुढे न्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे भाऊसाहेबांना कळले होते. आणि मग काय 1 जुलै 1932 रोजी जन्मास आली ” श्री शिवाजी शिक्षण संस्था ” याच दिवशी संस्थेची स्थापना व नोंदणी करण्यात आली. बेरार मराठा शिक्षण संस्थेचे, श्री शिवाजी हायस्कूल संस्थेकडे चालविण्यासाठी घेण्यात आले. तेथून सुरू झालेला हा प्रवास आज 250+ अधिक शिक्षण संस्थेपर्यन्त पोहचला आहे.
आज या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली प्रायमरी शाळा , हायस्कूल ,ज्युनियर कॉलेज , कला , वणिज्य , विज्ञान , कृषि , इंजिनियरिंग , मेडिकल , शिक्षण , विधी , व्यवस्थापन महाविद्यालये आणि वसतिगृह सुरू आहेत.
आज संस्थेकडे 100+ मराठी व इंग्लिश मिडियम च्या शाळा , 50+ महाविद्यालये , 50 + वासतिगृहे आणि इतर शैक्षणिक संस्था आहेत. संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र पश्चिम विदर्भ आहे.
भाऊसाहेबांनी लावलेल रोपट आज वटवृक्ष होऊन बहरल आहे. याच वृक्षाखाली बहुजनाच्या अनेक पिढ्या शिकत आहेत आम्ही सुद्धा त्या पैकी एक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. भाऊसाहेबांनी देशाच्या कृषि आणि शैक्षणिक प्रगतीत, आपल्या कार्याने अतुलनीय योगदान दिले आहे .
आज भाऊसाहेबांचा स्मृतीदिन त्या निमित्य विनम्र अभिवादन….!