TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 30 हजार शिक्षक भरती करणार असे जाहीर केले आहे. विद्यार्थी संघटना 50 हजार शिक्षक भरती एकाच टप्यात करावी यासाठी आग्रही आहे आणि त्याकरिता त्यांचे मुंबईत आंदोलन सुद्धा सुरू आहे.
अश्यातच एक सकारात्मक माहिती पुढे येत आहे. ती म्हणजे प्रशासकीय स्तरावर 55 हजार शिक्षकभरती साठी प्रशासन सुद्धा सकारात्मक आहे. आता फक्त त्याला सरकार कडून सुद्धा हिरवा कंदील मिळायला हवा. प्रशासनाला माहिती आहे राज्यात शिक्षकांच्या रिक्त जागा अभावी शिक्षणाचा दर्जा खालवत आहे आणि अतिरिक्त भर सुद्धा येत आहे.
आता उरला प्रश्न 55 हजार जागा सरकार भरणार का ? तर नक्कीच भरणार ! कारण उत्तरप्रदेश मध्ये 1 लाख शिक्षकांची भरती होणार आहे, राजस्थान मध्ये 50 हजार , बिहार मध्ये सुद्धा 50 हजार, तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, विकसित आणि शिक्षणात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राज्यात का होऊ शकत नाही.
55 हजार जागा भरण्यासाठी फक्त प्रशासन तयार आहे आणि प्रशासनाच्या भूमिकेला सरकारची मान्यता मिळल्यानंतरच ही गोष्ट पूर्णत्वास येऊ शकते. 55 हजार जागांसाठी आपण आता सरकार कडे आपली मागणी लावून धरायला हवी.राजकीय नेत्याना आपली मागणी पटवून द्यायला हवी त्याकरिता सर्व अभियोग्यता धारक शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करुन लढा द्यायला हवा.